‘हिंदू’ ही नेमाड्यांची magnum opus आहे, हे निश्चित. ‘कोसला’ पासून चालत आलेला त्यांच्या लेखनाचा प्रवाह ‘हिंदू’ मध्ये विशाल रूप धारण करतो. या कादंबरीच्या प्रकाशनाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ ने नुकतीच एक चर्चा घडवून आणली. त्यात अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली.
मुळात नेमाड्यांच्या या कादंबरीकडून वाचकांच्या अपेक्षाच फार होत्या / आहेत असे आजही या चर्चेतून स्पष्ट होते. हेच या कादंबरीचे यश म्हणता येईल. ‘हिंदू’ हा शब्दच मुळात भारतीयांसाठी आणि भारताच्या अभ्यासकांसाठी अत्यंत संवेदनशील. त्यात या कादंबरीचे शीर्षक अत्यंत तिरपागडे- ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’. आता या शीर्षकातला ‘हिंदू’ शब्द नेमके काय सुचवतो ? हिंदू धर्म ? की हिंदू संस्कृती ? हिंदू समाज की हिंदुत्व ही राजकीय विचारधारा ? की एकंदरीत सर्वच ? यापैकी नेमके कशाला ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ म्हटले आहे ?
मला वाटते या शीर्षकातील ‘हिंदू’ या शब्दावरून नेमाड्यांना ‘हिंदू’ ही आयडेंटिटी, ही ओळख, अपेक्षित आहे. ही ओळख एका विशिष्ट सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेतून तयार होते. नेमाडे तिलाच ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ म्हणतात. Continue reading
विन्स्टन चर्चिल यांच्या हजरजबाबीपणाचे, वाक्चातुर्याचे व इंग्रजी भाषेवील त्यांच्या प्रभुत्वाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. सैनिक, राजकारणी, युद्धनेता, मुत्सद्दी, वक्ता, लेखक, इतिहासकार, चित्रकार– एकाच आयुष्यात अशा अनेक भूमिकांमधून वावरलेला हा महापुरुष. साहित्याचे नोबेल मिळविणारा एकमात्र राजकारणी. व्यक्ती कमी व वल्ली अधिक.