
आज २३ एप्रिल. जागतिक पुस्तक दिन. भाषाप्रभू शेक्सपिअरची जयंती व पुण्यतिथी दोन्ही. त्याच्याच गौरवार्थ/ स्मरणार्थ आजचा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.
माणसांनी पुस्तके निर्माण केली आणि पुस्तकांनीही माणसे घडविली. माणूस आणि पुस्तके यांच्यात असे एक रम्य अद्वैत आहे. पुस्तकांनी माणसाला काय दिले नाही? ज्ञान तर दिलेच, पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या जीवाला दिलासा दिला, त्याला विरंगुळा दिला, त्याच्या जखमांवर फुंकर घातली, तर कधी निराश मनाला उभारी दिली. सृजन ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. त्याला सतत व्यक्त व्हावेसे वाटते. सर्जनातूनच तो व्यक्त होतो. ‘मुझे कुछ कहना है’- मला काही सांगायचंय – या सनातन उर्मीतून अभिव्यक्ती येते. मग कुणी कुठल्या तर कुणी कुठल्या माध्यमातून व्यक्त होतो. कुणी गातो, कुणी चित्रे काढतो, कुणी कविता करतो, कुणी कथा-कादंबऱ्या लिहितो, कुणी व्याख्यान देतो तर कुणी नुसते गप्पांचे फडच रंगवतो. कितीतरी तऱ्हा अभिव्यक्तीच्या ! अगदी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढणाऱ्या गृहिणीलासुद्धा त्यातून काही सांगायचे असते. Continue reading
Nataly Kelly, Jost Zetzsche