पु. ल. देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. पु.लं आयुष्यभर एक कलाकार म्हणून तर वावरलेच पण त्याहीपेक्षा एक मर्मज्ञ रसिक म्हणूनही त्यांनी आयुष्यभर गुणांचा गौरव केला. नवनिर्मितीपेक्षाही गुणीजनांचे कौतुक करणे त्यांना कदाचित अधिक आवडायचे. विविध प्रासंगिक लेख, विविध प्रसंगी केलेली गौरवपर भाषणे, या सर्वांतून त्यांनी असंख्य गुणीजनांचे कौतुक सतत केले.
प्रा. देवधर व पं. दिनकर कायकिणि या संगीतक्षेत्रातील दोन दिग्गजांचा गौरव करणारी ही दोन अत्यंत सुन्दर भाषणे….