रेप ऑफ ल्युक्रीस आणि व्हीनस अँड अॅडोनिस

रेप ऑफ ल्युक्रीस:

Buy The Rape of Lucrece Book Online at Amazon | The Rape of Lucrece Reviews  & Ratingsहे शेक्सपिअरने रचलेले एक दीर्घकाव्य आहे. या काव्याच्या कथेचे मूळ रोमन साम्राज्याच्या इतिहासात व तत्कालीन रोममध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांमध्ये आहे. रोमचा राजपुत्र सेक्स्टस टारक्वीनियस त्याच्या मित्राची पत्नी ल्युक्रीस हिच्यावर बलात्कार करतो. काव्याच्या सुरुवातीला टारक्वीनियसची ल्युक्रीससाठी असलेली अभिलाषा व टारक्वीनियसद्वारे ल्युक्रीसचा बलात्कार यांचे वर्णन आहे. यानंतर टारक्वीनियसला केलेल्या कृत्याबद्दल भयंकर विषाद वाटायला लागतो. यापुढे कवितेचा रोख मुख्यतः ल्युक्रीसला वाटत असलेली अतीव लज्जेची भावना यांच्याकडे वळतो. या काव्यात शेक्सपीयरने मुख्यतः नाट्यछटा किंवा ड्रामॅटिक मोनोलॉग या काव्यप्रकाराचा वापर केला आहे. प्रथम टारक्वीनियस स्वतःच्या मनात ल्युक्रीसबद्दल असलेली अभिलाषा व्यक्त करतो व सोबतच ल्युक्रीस ही त्याच्या मित्राची पत्नी असल्याने तिच्यावर बळजबरी करणे म्हणजे मित्रद्रोह होईल व त्यामुळे आपल्या व आपल्या परिवाराच्या कीर्तीला कायमचा बट्टा लागेल असेही तो म्हणतो. ल्युक्रीस आपल्यावर झालेल्या बलात्कारामुळे तिला वाटत असलेली लज्जा व भयंकर वैषम्य व्यक्त करते व शेवटी आत्महत्येचा निर्णय घेते. ल्युक्रीसला आत्महत्या करताना दाखवलेले अनेक समीक्षकांना आवडलेले नाही. कारण रोमन संस्कृतीत अपमानाच्या वैषम्यातून आत्महत्या करणे स्वाभिमानाचे प्रतीक मानले जात असे. याउलट ख्रिश्चन धर्मात मात्र आत्महत्येला महापाप समजले जाते.

व्हीनस अँड अॅडोनिस:

Venus and Adonis१५९० च्या सुमारास लिहीलेले व्हीनस अँड अॅडोनिस हे काव्य म्हणजे शेक्सपिअरची पहिलीवहिली काव्य रचना आहे. हे काव्य महाकाव्याच्या स्वरूपात लिहिलेले असले तरी महाकाव्यापेक्षा बरेच लहान असे एक दीर्घकाव्य आहे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अनेक नवोदित कवी या प्रकारची काव्ये लिहित असत. ओव्हिड या रोमन कवीने लॅटिन भाषेत लिहिलेल्या मेटामॉर्फॉसिस या महाकाव्यापासून प्रेरणा घेऊन शेक्सपिअरने हे काव्य रचले. व्हीनस ही रोमन संस्कृतीतील सौंदर्य व प्रेमाची देवता पृथ्वीवरच्या ॲडोनीस या हँडसम शिकारी तरुणाच्या प्रेमात पडते. (ओव्हिड ने त्याच्या मूळ काव्यात ॲडोनीस हा व्हीनसच्या प्रेमात पडतो व तिची प्रेम आराधना करतो दाखविले आहे.) मात्र शेक्सपिअरच्या ॲडोनीसला प्रेमाबिमात फारसा रस नाही. तो उलट व्हीनसच्या प्रेमाचा अव्हेर करतो बीडच्या काव्यातील ॲडोनीस अपघाताने मृत्यू पावतो साक्षात प्रेमाची देवता स्वर्ग सुंदरी वीनस ॲडोनीस सारख्या मृत्यू लोकांच्या तरुणाच्या प्रेमात पडलेली आहे असे असूनही शेक्सपिअरच्या ॲडोनीस मात्र विनच्या प्रेम याच यांचा सतत अव्हेर करतो शिकारीसाठी जंगलात गेलेल्या ॲडोनीस ला पाहताच व्हीनस त्याच्यावर मोहित होते व त्याच्याकडे प्रेमाची याचना करते ते मात्र ॲडोनीस तिला नकार देतो व त्यामुळे ती बेशुद्ध पडते प्रेम अभंगामुळे तिचा मृत्यू तर झाला नाही ना असे वाटून ॲडोनीस तिला कुरवाळतो व ती जागी होऊन पुन्हा ॲडोनीस कडे प्रेम याचे ना करते मात्र ॲडोनीस पुन्हा नकार देत आपण उद्या जंगली अस्वलाच्या शिकारीसाठी जाणार असल्याचे सांगतो ही शिकार करताना ॲडोनीस ला मृत्यू येणार आहे हे वीनस आपल्या दैवी शक्तीने जाणून घेते व त्याच्या शिकारीच्या बेटापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तिचे ना एकदा ठरल्याप्रमाणे शिकारीला जातो व जंगली अस्वल आखडून मारला जातो वीनस ला आपल्या प्रियकराच्या मृत्यूचे अपार दुःख होते जमिनीवर सांडलेल्या डॉनच्या रक्ताच्या थेंबापासून वायलेट ची फुले उगवतात दुखी अंतकरणाने प्रेम अभंगामुळे कष्टी झालेली वीनस पुन्हा देवलोकात परतते खरे प्रेम म्हणजे काय याचा शोध घेत असलेल्या तरुण शेक्सपिअरचे दर्शन हे काव्य आपल्याला घडवत ते अत्यंत उत्कट व लालित्यपूर्ण असे हे काव्य शेक्सपियरच्या संपूर्ण जीवन काळात अतिशय लोकप्रिय झाले होते

One thought on “रेप ऑफ ल्युक्रीस आणि व्हीनस अँड अॅडोनिस

  1. छान ! थोडक्यात चांगला परिचय करून दिला आहेस . काव्य हा माझा प्रांत नाही त्यामुळे वाटेला जाईन असं वाटत नाही . एक दोन लिंक पाठवतो . अभिप्राय दे .
    मुकुंद वझे .

    Sent from my iPhone

    >

Leave a comment